Tuesday 10 January 2017


सनक
(निकिता अनिलराव भगत)

आई वडील आणि नातेवाईकांना
लागलाय एकच ध्यास. .......
चला करूया ह्या पोरीचे
पिवळे हात..........

हा नाही बरा तो
पण नाही खरा
पोरगी  म्हणते,
मला हवा unique नवरा.

दोन पाहुणे येतात दारी,
चहा पोहे कार्यक्रम लय भारी. ...
निरोपाचा पत्ता नाही,
फूकटी स्वारी येती वारंवारी.... ...

साडी, लिपस्टिक आणि लाली..
लावून नटकी पण दिसते
जणू अप्सराच आली....
या इंद्रधनू  दरबारी. .........

शेवटी जुळवून येतात
रेशीम गाठी. ......
माशी शिंकते लगेचच . ...
निघता हुंड्याची बोलणी.

रूढी परंपरांचा
 असे मोठा साज..
बळी घेतले .....
कित्येक अहोरात...




जर लग्न म्हणजे
स्वर्गातील जोडी....
मग कशाला त्याकरता
ही खटाटोप एवढी....

एका दिवसाच्या सोहळ्यात खेळला जातोय. ..
लाखोंचा जुगार. .....
कुणी तरी थांबवा रितीच्या नावाखाली होणारा
पैश्यांचा उतमाज....


#मनाचीसनक.......#कागदावरठळक.

No comments:

Post a Comment